विद्यार्थ्यासाठी डिझायनर क्षेत्रातील वेगवेगळया वाटा

सध्या करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण विद्यार्थी गणित चांगले असेल तर फायनान्स किंवा अकाऊंटिंग क्षेत्रात, जीवशास्त्र चांगलं असेल तर डॉक्टर, सरकारी नोकरी हवी असल्यास सरकारी परीक्षेची तयारी करतात. पण सध्या डिझाईन करिअरमध्ये ४० पेक्षा अधिक करियर पर्याय उपलब्ध आहेत हे फार कमी लोकांना माहित आहे. भारतातील प्रत्येक भागात ५० ते ९० लाख डिझाइनरची गरज आहे. पण फक्त पाचशे ते सातशे डिझाइनर भारतात आहेत. चीन, अमेरिका आणि जपान येथे लाखोंच्या संख्येत डिझाइनर्स आहेत. जर भारताला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर भारतात अनेक डिझाइनर निर्माण करण्याची गरज आहे. जर विद्यार्थ्यांनी कौशल्यावर लक्ष दिले तर भारत हा प्रगत देश होईल.

करिअरच्या संधी

डिझाईन क्षेत्रात वेगवेगळ्या शाखा असून प्रॉडक्ट, ग्राफिक, फॅशन, ॲनिमेशन, मल्टिमीडिया इत्यादी अनेक शाखांमध्ये करिअरच्या संधी आहेत. विविध पर्यायांतून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे निवड करता येते. डिझाईनचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या क्षेत्रात करिअर करता येते. विविध शाखांबाबत माहिती घेऊया…..

औद्योगिक डिझाईन – यात विविध प्रॉडक्ट डिझाईन केले जातात. औद्योगिक डिझाईन ही भौतिक उत्पादनांवर लागू केलेली डिझाईनची प्रक्रिया आहे जी मोठ्या प्रमाणावर उत्पादनाद्वारे तयार केली जाते. यात इंटेरिअर डिझाईन, ग्लास आणि सिरॅमिक डिझाईन, टॉय आणि गेम डिझाईन, मोबाईल डिझाईन, कॉस्मेटिक डिझाईन असे अनेक पर्याय आहेत. पण या सगळ्यात कम्युनिकेशन महत्वाचे आहे.

ग्राफिक डिझाईन – ग्राफिक डिझाईन हे प्रिंट मिडियाशी संबंधित आहे. लोगो डिझाईन करणे, बॅनर, पोस्टर याचा ग्राफिक डिझाईनमध्ये समावेश होतो.

फिल्म आणि व्हिडिओ डिझाईन – फिल्म आणि व्हिडिओ मीडिया हे खूप इफेक्टिव्ह माध्यम आहे. यात फोटोग्राफी, इन्स्ट्रक्शनल फिल्म्स मेकिंग, व्हिडीओग्राफी, फिल्म लँग्वेज/फिल्म थिअरी, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, प्रोडक्शन डिझाईन इत्यादी विषय, फिल्म आणि व्हिडिओ डिझाईनच्या सर्व महत्त्वाच्या पैलूंची अतिशय मजबूत वैचारिक समज विकसित करतात.

ॲनिमेशन – ॲनिमेशन हे कार्टूनशी संबंधित आहे. टॉम अँड जेरी, छोटा भीम हे सिरीयल क्लासिकल ॲनिमेशन आहेत. ॲनिमेशनमध्ये हालचाली, बॅकग्राउंड आणि रंग यांचा समावेश होतो.

फोटोग्राफी डिझाईन – फोटोग्राफी डिझाईन क्षेत्रात दृश्य भाषेत संवाद साधता येतात. ज्या विद्यार्थ्यांना फोटो चांगले काढता येतात त्यांनी नक्कीच या क्षेत्रात जावे. प्रॉडक्ट, एरियल फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ याचा समावेश यात होतो.

आयटी इंटिग्रेटेड डिझाईन – या क्षेत्रात विविध न्यू मिडिया तसेच सोशल मिडिया ॲप डिजाइन केले जातात.
इन्फॉर्मेशन डिझाईन – विद्यार्थी उत्तम कंटेन्ट रायटिंग करत असतील तर या क्षेत्रात येऊ शकतात.

डिजिटल गेमिंग डिझाईन – डिजिटल गेमिंग डिझाईन हे आकर्षण असल्याने खूप मजबूत करिअर पर्याय आहे. डिजिटल गेम्स हे संगणक, गेम सिस्टम, टेलिव्हिजन किंवा मोबाइल डिव्हाइसवर खेळले जाणारे गेम आहेत. ते विशेषतः शैक्षणिक हेतूंसाठी बनवले जातात.

रिटेल आणि सेल्स डिझाईन – रिटेल आणि सेल्स डिझाईन हे उद्योगासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे इमेज बिल्डिंगचे काम करते.

फॅशन डिझाईन – फॅशन ही कधीच संपत नाही. त्यामुळे यात खूप करियर संधी आहेत. यात ९ प्रकार आहेत. साडी, ड्रेसेस, पार्टी वेअर डिझाईन केले जातात.

१० वी नंतर कोणती शाखा निवडावी?

आजच्या आधुनिक युगात डिझाईन क्षेत्र हे अनेक ज्ञानक्षेत्रांचा योग्य समन्वय साधत आहे. कोणतीही नवीन वस्तू किंवा सेवा डिझाईन करत असताना डिझाइनर्सना अनेक गोष्टींचा खूप सखोल विचार करावा लागतो. डिझाईन क्षेत्राचा विज्ञान, कला आणि वाणिज्य या तीनही शाखांशी संबंध आहे. त्याचप्रमाणे डिझाईन संस्थांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी १० वी नंतर कोणत्याही विशिष्ठ शाखेची अट नाही. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी या तिन्ही शाखांपैकी कोणतीही शाखा निवडता येते. राष्ट्रीय अभिकल्प संस्थान (NID), भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IDC IIT Bombay), राष्ट्रीय फॅशन प्रौद्योगिकी संस्थान (NIFT) आणि इतर डिझाईन शिक्षण संस्था विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना डिझाईनच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना समान संधी देतात. त्यामुळे डिझाईन क्षेत्रात प्रवेश करणारे विद्यार्थी आणि फक्त आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेसाठी (NATA) विज्ञान शाखा अनिवार्य आहे.

प्रवेशप्रक्रिया

या क्षेत्रात कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश प्रक्रियेसाठी १२ वी परिक्षेचे गुण ग्राह्य धरले जात नाही. तुमची निवड डिझाइन अभियोग्यता चाचणीद्वारे केली जाते. त्यामुळे १२ वी परीक्षेचे ओझे घ्यायची गरज नाही. यासाठी डिझाईन अभियोग्यता चाचणीची तयारी करा.

ही परीक्षा कशी असते?

NIFT डिझाईन ॲप्टिट्यूड टेस्ट असते. ही ५ तासाची परीक्षा असते. ३ तास चित्रकला, २ तास सामान्य क्षमता चाचणी असे त्याचे स्वरूप असते. दोन्ही मिळून ८० टक्के प्रमाण असते. नंतर त्याची प्रासंगिक चाचणी होते. मग निवड झाल्यावर ४ वर्षाचा डिग्री प्रोग्राम असतो. चित्रकलाचे विविध प्रकार शिकवले जातात. NATA परीक्षेचे चे ३ अटेम्प असतात. ही परिक्षा २०० गुणांची असते. JEE परीक्षेचे २ अटेम्प असतात. ही ४०० गुणांची परीक्षा असते. फाईन आर्ट त्याला महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतात. ही साडेचार तासाची परीक्षा असते.

परीक्षा देण्याची वयोमर्यादा

डिझाईन इन बॅचलर करायचं असेल तर २० वर्ष, फॅशनमध्ये बॅचलरसाठी २३ वर्ष वयोमर्यादा, डिझाईनमध्ये मास्टर करायचं असेल तर IIT या परीक्षेसाठी वयोमर्यादा नाही. NID आणि NFT परीक्षेसाठी ३० वर्ष वयोमर्यादा आहे. आर्किटेक्चरसाठी २५ वर्ष वयोमर्यादा आहे. NATA आणि JEE देण्यासाठी वयोमर्यादा नाही. फाईन आर्ट साठी २५ वर्ष वयोमर्यादा आहे.

सिलिका क्लासेस

सिलिका क्लासेसमध्ये डिझाइन अभियोग्यता चाचणी देऊन कोणत्या शाखेत करिअर करायचे हे ओळखू शकता. तुम्ही १० वी नंतर या क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ शकता. येथे अनुभवी शिक्षक असतात. ते विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये विचार व्यक्त करायला शिकवतात. येथे विविध सेमिनार होतात. येथे अभियोग्यता चाचणी आणि करिअर मार्गदर्शनाद्वारे वेगवेगळ्या डिझाइन करिअर स्ट्रीमसाठी योग्यता आणि आवड वैज्ञानिकदृष्ट्या तपासली जाते. योग्य मार्गदर्शन केले जाते. करिअरचा योग्य मार्ग निवडण्यापासून, नियोजन, अर्ज आणि मुलाखतीसाठी मार्गदर्शन केले जाते. SILICA संस्थेच्या 15 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी NID, UCEED, NIFT, NATA, JEE पेपर 2, ART CET, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या आहेत. SILICA उच्च दर्जाचे ऑफलाईन वर्ग आणि ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करते. SILICA स्वत: तयारीसाठी अभ्यास साहित्य, पुस्तके आणि ऑनलाइन ॲप देखील प्रदान करते.

प्रतिक्रिया

मी ठाणे, घोडबंदर, वाशी, कल्याण, नागपूर या सिलिका क्लासेस केंद्राचा संचालक आहे आणि विद्यार्थ्यांना डिझाईनिंग क्षेत्रातील विविध करिअरसाठी मार्गदर्शन करत आहे. माझा प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोकृष्ट बनवण्याचा प्रयत्न असतो. मला असे वाटते उद्योग हे इनोव्हेशन आणि डिझाईनशिवाय वाढू शकत नाही. चित्रकला ही फक्त कला आहे. पण डिजाइन ही वापरकर्त्यावर अवलंबून असते. डिझाईन तुम्ही तुमच्या कल्पनेने करू शकता. जगात ५० टक्के विद्यार्थ्यांचे सर्जनशील मन असते. जर त्यांनी आपली आवड आणि पॅशन फॉलो केली तर ते जगाला प्रत्येक गोष्टीत नवनवीन पर्याय देऊ शकतात. आज जगाला आणि प्रत्येक उद्योगाला नवनवीन पर्याय देणारे हवे आहेत. म्हणून डिझाइनरची सध्या गरज आहे.

डॉ. अजय नाईक, MD(hom),MBA (Healthcare IT) Microsoft, SUN,CISCO, LINUX, ITIL,SIX SIGMA,AGILE Certified, UX/UI designer

मी सिलिका क्लासेसमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला डिझाईन क्षेत्राचे फारसे ज्ञान नव्हते. मला या क्लासमध्ये अभ्यासाच्या तयारीसाठी अभ्यास साहित्य, पुस्तके आणि ऑनलाइन अॅप देखील मिळाले. येथील शिक्षकांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले. येथे शेवटच्या २ महिन्यात मॉक टेस्ट होतात. त्यामुळे माझा चांगला सराव झाला.

आयुषी सिंघल, 99.2 percentile JEE entrance exam