आपल्या लिविंग रूमला करा अधिक प्रशस्त

लिव्हींग रूम किंवा दिवाणखाना म्हणजे घरात राहत असलेल्या परिवाराच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंबच असते. इथे राहणाऱ्या व्यक्तींच्या मूल्यांचा, आवडीनिवडींचा आणि संस्कृतीचा तो आरसा असतो. ही जागा संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्याचा मल्टी फंक्शनल एरीया म्हणून देखील कार्य करते. आणि नेमकी हिच महत्वाची बाब या क्षेत्राचे नियोजन करताना लक्षात घेतली पाहिजे. घराचे डिझायनिंग करत असताना वेगवेगळी मटेरीयल, रंग, प्रकाश, फर्निशिंग यांचा इष्टतम वापर आणि लेआउटच्या निवडीमध्ये संतुलन हे स्थापत्य वेदाच्या अनुषंगाने नियोजनाच्या आवश्यक बाबी आहेत. ज्यांचे अंतिम लक्ष्य संपूर्ण जागेसाठी सकारात्मक ऊर्जा आणणे हा आहे.
उदाहरणार्थ, मातृका शास्त्र जे देवनागरी वर्णमाला चित्ररूपाने किंवा डिजिटल प्रिंटच्या माध्यमातून वापरून सकारात्मक ऊर्जा निर्माण करून वाढवण्याचे  आणखी एक शास्त्र आहे. अशी ही बऱ्याच प्राचीन तंत्रांमधील काही तंत्रे आहेत जी जागेच्या उपयुक्ततेमध्ये, एस्थेटीक समतोल ठेऊन संपूर्ण परिवाराच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी याचा विचार केला गेला पाहिजे.

पडदे, वॉलपेपर तसेच हार्डवेअर आणि रंग हे इंटेरियर डिझायनिंगचा अविभाज्य भाग आहेत, जे स्थापत्यवेदातील सूचनांनुसार योग्य निवडीसह लागू केल्यावर त्या ठिकाणाच्या एकूण अॅम्बियन्समध्ये तसेच सकारात्मकतेत वाढ होऊ शकते. लिव्हिंग रूम हटके पद्धतीने सजवण्यासाठी तुम्ही खालील टिप्सचा वापर करू शकता .

•लिव्हींग रूममधील फर्निचर आणि बसण्याची व्यवस्था adjustable असली पाहिजे, जेणेकरून सर्व कुटुंब एकत्र येते तेव्हा यात बदल करता येईल. यामुळे कमीत कमी जागा व्यापली जाते व वापरायला पुरेशी जागा मिळते. मुंबईसारख्या शहरांमध्ये अश्या पद्धतीच्या व्यवस्थेची गरज जास्त भासते.

* रंग संयोजन लिव्हिंग रूम सजवताना विचारत घेतली जाणारी महत्वाची गोष्ट आहे. लिव्हिंग रूमचे रंग तुम्ही निवडलेल्या थीमनुसार असले पाहिजेत. परंतु खोलीचा रंग बेज आणि फिकट टोनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

– लिव्हिंग रूमचे फर्निचर हा अविभाज्य भाग आहे. यात अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. यात कॉन्ट्रास्ट फर्निचरला जास्त मागणी आहे. लाकडी रंगात किंवा लिबास फिनिशचा यात समावेश होतो.  आजकाल नवीन आणि ट्रेंडी रंग आणि टेक्सचरमधील लॅमिनेट बाजारात उपलब्ध आहेत जे लिव्हिंग रूमचा चेहरा बदलू शकतात.

– आजकाल वेगवेगळ्या स्टाइलचे पडदे बाजारात उपलब्ध आहेत. ज्यात रोलर पडदा, व्हेनेशियन ब्लाइंड्स इ. अनेक प्रकरांचा समावेश होतो. यामुळे लिव्हिंग रूमची शोभा वाढते.

– तुम्ही घरात नसताना सुद्धा घर सजवू शकता. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुमचा मोबाईल वापरा आणि पार्टीचे दृश्य निवडा- एसी चालू होईल, लाईट्स पार्टी मोडमध्ये असतील, पडदे बंद होतील, कॉफी मशीन चालू असेल, हॉबवर प्रेशर कुकर कार्यान्वित होईल आणि ज्या क्षणी तुम्ही घराचे दार उघडता तेव्हा घर सर्व सज्ज दिसेल! होय, हे स्मार्ट होम आहे, जिथे ऑटोमेशनमुळे हे सर्व शक्य आहे आणि हे आधुनिक इंटेरियरसाठी खूप योग्य आहे. सजावटीचे लाईटस् प्रभाव निर्माण करतात. अशा पद्धतीची प्रकाश योजना तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये करू शकता.

-इनडोअर प्लांट्स जागेच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच ताजेपणाही देतात आणि निसर्गाशी जोडतात. मुंबईतील घरांमध्ये जागेची अडचण लक्षात घेऊन व्हर्टिकल गार्डनचे नियोजन करता येते. या गार्डनमधील रोपांना पुरेसे पाणी आणि सूर्यप्रकाश मिळण्याची काळजी मात्र घेतली पाहिजे.

-भिंतींचे वेगळेपण अनेक मनोरंजक मार्गांनी वाढवले जाऊ शकते. रंगाबरोबरच एकंदर थीमशी मेळ साधणारी चित्रं, म्युरल्स, फॅमिली ट्री भिंतीवर लावावी.

या सर्वांशिवाय, दिवाणखान्यात टीव्ही ॲक्सेसरीज, एसीसाठी रिमोट, म्युझिक सिस्टीम, जेवणाजवळ क्रॉकरी युनिट, कौटुंबिक चित्रांचे प्रदर्शन, कलाकृती, फुलांचे शोपिस इत्यादी गोष्टींसाठी स्मार्ट ओपन/हिडन स्टोरेज असावे.

रश्मी तिवारी,
इंटेरियर डेकोरेटर व स्थापत्यवेद अभ्यासक
तथास्थु  इंटिरियर
https://Www.Tathaastuinteriors.com
=================

दुकाने

ड्रीम डेकोर

ठाण्यातील फर्निशिंगशी संबंधीत हे प्रसिद्ध दुकान आहे. येथे विविध प्रकारचे पडदे, सोफ्यासाठी टेपेस्ट्री, गादी मिळते. गरजेनुसार पडदे आणि वॉल पेपरसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडची विस्तृत श्रेणी येथे पाहायला मिळत आहे.
कुठे- मानपाडा, ठाणे

भावना ट्रेडिंग

भावना ट्रेडिंग हे आधुनिक हार्डवेअरसाठी एक उत्तम शॉप आहे. इथे कॉम्पॅक्ट फर्निचर, सुबक आणि मजबूत फर्निचर उपलब्ध आहे.
कुठे- वर्तकनगर, ठाणे (प)