मागच्या भागात आपण जाणुन घेतले कि, कोणत्या कारणासाठी आपण फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकतो.
जेव्हा आपण कोणत्याही डॉक्टरकडे जातो तेव्हा ते कंबरदुखी (Lumber spondylosis), गुडघेदुखी (Osteo Arthritis) किंवा मानेचा त्रास (Cervical Spondilitis) आहे असे निदान (Medical Diagonasis) करतात. पण जेव्हा पेशंट फिजिओथेरपिस्टकडे येतो तेव्हा त्यांच्या दुखण्याच्या कारणाचा शोध घेतात, नेमका कोणत्या स्यानु मुळे हा त्रास होत आहे ते बघतात आणि त्यावर उपचार सुरू करतात. ह्याला शारीरिक निदान (Physical Diagonasis) म्हणतात.
कधी कधी टाच दुखत असते पण त्याचे कारण कंबरेतला स्नायू दुखावलेला असतो.
शारीरिक निदान (Physical Diagonasis) मध्ये खालील मुख्य पाच तपासण्या केल्या जातात.
१) दुखणे – पहिल्यांदा दुखण्याच्या खालील गोष्टीचे examinitaion केले जाते. नेमके कोणत्या ठिकाणी दुखत आहे, किती भागात दुखते (एरिया ऑफ पेन), तीव्रता, पेन कशाने कमी होते, कधी पेन वाढते.
२) रेंज ऑफ मोशन – सांधे (जॉइंट) मध्ये किती हालचाल (मूव्हमेंट) होऊ शकते, कोणत्या हालचालीमध्ये दुखणे वाढते का, ह्यात “End Feel” ही समजुन येतो. “End feel” म्हणजे एक प्रकारची संवेदना (Resistance). त्या सांध्याची शेवटची रेंज ऑफ मोशन.
३) स्नायूची ताकद – स्नायूची ताकद हि दोन प्रकारात पाहिली जाते. स्नायूची त्या ग्रुप स्नायू मध्ये किती ताकद आहे आणि त्या स्नायू मध्ये वैयक्तिक किती ताकद आहे.
४) लवचिकता – स्नायूची लवचिकता किती आहे हे तपासले जाते.
५) दैनंदिन जीवनात येणाऱ्या मर्यादा – त्या स्नायूमुळे दैनंदिन जीवनात काही मर्यादा येतात का? जसे फ्रोजन शोल्डर (खांदे) च्या रुग्णांना केस विंचारता येत नाहीत, जेवण करता येत नाही.
ह्या पाच प्रकारच्या चाचण्या केल्यावर समजुन येते की, कोणते सांधे दुखतात, कोणत्या स्नायू मध्ये ताकद कमी आहे, कोणत्या हालचाली मर्यादित आहेत. दुखणे जाणे आणि त्या स्नायू मध्ये ताकद येणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी वत्सला वेलनेस फिजिओथेरपी सेंटर मध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन उपचार पद्धती ठरवली जाते. उपचाराचा कालावधी हा दुखणे किती जुने आहे, तुमच्या स्नायूचची ताकद आणि शरीराचा प्रतिसाद यावर अवलंबुन असते.
पुढच्या भागात आपण कोणत्याही दुखण्यावर किती वेळ लागतो आणि का लागतो यावर चर्चा करुयात.
डॉ. स्मृती विशाल सोरटे (PT)
गोल्ड मेडलिस्ट (केईएम, मुंबई)
15 वर्षांचा अनुभव
वत्सला वेलनेस फिजिओथेरपी क्लिनिक
शाखा – राम मारुती रोड आणि घोडबंदर रोड
For Appointment – 9136848095 / 9136941509