* मालमत्ता कर देयक वाटपाचे प्रकरण
* काँग्रेसच्या आंदोलनला यश
उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर देयकाचे वितरणाचे काम शहरातील महिला बचत गटाने दिले होते. बचत गटाच्या महिलांना केलेल्या कामाचा मोबदला दिला नसल्याने आज मनपा मुख्यालय समोर कॉग्रेस पक्ष व महिला बचत गटाच्या महिलांनी संयुक्त आंदोलन करण्यात आले.
उल्हासनगर महापालिका हद्दीतील मालमत्ता कर देयकाचे वितरणाचे काम २०० बचत गटाच्या महिलांना दिले होते. त्यांना आठ महिन्यांपासून कामाचा मोबदला दिला नाही. त्यांची एकूण थकबाकी सुमारे ४२ लाख रुपये इतकी आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी आयुक्तांना वारंवार भेटून पाठपुरावा केला. आज मनपा मुख्यालयासमोर अंजली साळवे यांच्या नेतृत्वात उल्हासनगर काँग्रेस व महिला बचत गट यांचे संयुक्त आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त डॉ. सुभाष जाधव व कर निरीक्षक जेठानंद करमचंदानी ह्यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी २९ मे २०२४ रोजी कोलब्रो ग्रुप यांना मनपातर्फे देयक अदा झाल्यानंतर ३० मे २०२४ पासून महिला बचत गटाच्या बिल वाटपाचे मोबदला काम सुरु करण्यात येईल व तीन ते चार दिवसात संपूर्ण मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्याचसोबत बिल वाटपाचे काम कॉलब्रो ग्रुपकडून थेट महापालिकेतर्फे करण्यात यावे, ह्यावर लवकरच आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
या वेळी माजी नगरसेविका अंजली साळवे, अध्यक्ष रोहित साळवे, महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे, सिंधुताई रामटेके , मालती गवई , कालिंदी गवई ,मंगला मुजुमदार , राकेश मिश्रा, अनिल यादव, शैलेंद्र रुपेकर, फरियाद शेख, फॅमिदा सैयद, कायद्याने वागा संघटनेचे संजय वाघमारे, अण्णा देशमुख आणि महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.