ठाणे : सेवारत्न पुरस्कार विजेते हरेश्वर मोतीराम मोरेकर संचलित मोरेकर विनाशुल्क गणित अभ्यासिकेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चार मुलगे आणि पाच मुलींचा समावेश होता.
या अभ्यासिकेतील मुलींमध्ये श्रिया कोळी (९७टक्के), निधी कोळी (९४.८०टक्के) तर मुलांमध्ये आर्यन डोलकर (९०.२०टक्के) यांनी स्पृहणीय यश संपादन केले. तनिष्क धुमाळ, युवराज नाखवा, हितार्थ कोळी, श्रावणी बंगलेकर, स्वराली कोळी (झावडे) आणि अनन्या वाघमारे दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना गणितगुरु हरेश्वर मोरेकर म्हणाले, आपल्या अभ्यासिकेने शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थी कला किंवा वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखा पसंत करीत आहेत.