उन्हाळ्यात घरच्याघरी त्वचेची निगा कशी राखावी ?

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. उन्हाळ्यात तापमान वाढत असताना, त्वचेच्या समस्या अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. कडक उन्हामुळे त्वचेवर तेलाचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे मुरूमं येतात. त्यामुळे या दिवसात त्वचेची काळजी घेणे आवश्यक असून याबाबत काही टिप्स आणि सल्ला तज्ज्ञांनी खाली
दिला आहे.

‘त्वचा’ हा स्त्रीच्या आरोग्याचा आरसा आहे. शरीरातील आजार त्वचेवर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम दाखवत असतात. त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा भाग आहे. त्वचेला अखंड होणारा रक्त पुरवठा यावर त्वचेचे सौंदर्य अवलंबून असते. तसेच योग्य षड् रसात्मक आहार, उत्तम मानसिक आरोग्य हे त्वचेचे सौंदर्य खुलवते.

सामान्य त्वचा (त्वचेचा प्रकार) – उन्हाळ्यात काय काळजी घ्याल ?
भरपूर पाणी प्यावे.

पाण्यात भिजवलेले बदाम खावे.

आंघोळीच्या पाण्यात संत्र किंवा लिंबाच्या सालींचे तुकडे टाकावेत. त्वचा टवटवीत होते.

कलिंगडाच्या रस लेपाने मानेचा काळवंडलेपणा कमी होतो.

कोरडी त्वचा (त्वचेचा प्रकार) – उन्हाळ्यात काय काळजी घ्याल ?

भरपूर पाणी प्यावे.

गव्हाचे सत्व खावे.

खोबरेल तेलाने मसाज करावा.

दुधाच्या सायीमध्ये बेसन पीठ मिसळून आंघोळीआधी वापरावे.
टोमॅटो रसाचा लेप चेहऱ्याला लावाव.

तेलकट त्वचा (त्वचेचा प्रकार) – उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ?

भरपूर पाणी प्यावे

कलिंगड, काकडी यांचा आहारात समावेश करावा.

बटाट्याचा किस किंवा काकडीच्या किसाने चेहऱ्याला मसाज करावा. चेहऱ्याला छान ग्लो येतो.
————–
१. सूर्यप्रकाशात बाहेर जाताना स्कार्फ किंवा गॉगल वापरावा.
अल्ट्राव्हायोलेट किरणे ही त्वचेवर पडल्याने त्वचा काळवंडते.

२. उन्हातून आल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

३. चेहरा धुतल्यावर त्यावर बर्फाचा तुकडा फिरवावा.

४. फळांचे ज्यूस, कोकम सरबत आवर्जून प्या.

५. ओठांना साजूक तूप रोज लावा.

६. दही उत्तम एक्सफिलिएटर आहे. खोल क्लिनर म्हणून काम करते. दही व मध असा लेप चेहऱ्याला लावा.

– डॉ. मानसी मेहेंदळे-धामणकर
तन्वी हर्बल्स
संचालिका