मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात !

ठाणे: जिल्ह्यातील ठाणे लाेकसभेतील २४, कल्याणमधील २८ आणि भिवंडी मतदारसंघातील २७ उमेदवारांसाठी साेमवारी जल्लाेषात मतदान झाले.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील ६६ लाख ७८,४७६ मतदारांपैकी ५३.०९ टक्के मतदारांनी ६,६०४ मतदान केंद्रांवर १३,२०८ मतदान यंत्रात (ईव्हीएम) त्यांचे मत बंदिस्त केले आहे. ही यंत्रे आता strong रूम मध्ये कडक बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.

सोमवारी मतदानानंतर या मतदान यंत्रांना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरव्दारे या strong रूममध्ये जमा करण्यात आले आहे. या जमा झालेल्या ठिकाणीच ४ जून राेजी या यंत्रांमधील मतमाेजणी करण्यात येईल. ताेपर्यंत या यंत्रणाची सुरक्षा शस्त्रधारी सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून तीन टप्प्यांत हाेईल.

ठाणे लाेकसभामतदारसंघातील मतदान यंत्रे २,४५३ मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर यंथील न्यू हाेराॅयझन हायस्कूल, कासारवडवली, घाेडबंदर राेड येथे जमा करण्यात आलेली आहेत. याच हायस्कूलमध्ये मतमाेजणी करण्यात येणार आहे. तर कल्याण लाेकसभेच्या १९६० मतदान केंद्रांवरील ३,९२० मतदान यंत्रे डाेंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कलामंदीर, नाट्यगृहाच्या तळमजल्यात कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत. या यंत्रांना दहा ट्रक, सहा टेम्पाे आणि सात कंटेनरव्दारे या strong रूममध्ये जमा करण्यात आली. या यंत्रातील मतमाेजणी डाेंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै. सुरेद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे.

भिवंडी लाेकसभेच्या २,१९१ मतदान केंद्रांवरील ४,३८२ मतदान यंत्रांना सावद गांव येथील केयुडी बिझनेस क्लस्टर, येथे २० ट्रक, दाेन टेम्पाे आणि आठ कंटेनरव्दारे आणण्यात आले आहेत. येथेच मतमाेजणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.