एस.टी. कामगारांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस

ठाणे : येथील एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर राज्य शासन आणि प्रशासन पातळीवर झालेल्या बैठकीतील १८ निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या अंतर्गत ठाणे अंतर्गत संघटनेने आंदोलन छेडले आहे.

याबाबत प्रशासन पातळीवर 29 ऑगगस्ट 2023 रोजी झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त पाठवलेले असून, 19 सप्टेंबर 23 रोजी झालेल्या बैठकीची कार्यवृत्ते माहिती पाठवली असतानाही काही महत्त्वाच्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. संघटनेच्या उपोषण नोटीसमध्ये मागण्यांवर प्रशासन व राज्य शासन पातळीवर घेतलेल्या निर्णयांची तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊ नये. त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, असे मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद मोरे व ठाणे जिल्हा सचिव नंदकुमार देशमुख यांच्या वतीने मागण्या केल्या आहेत.

19 सप्टेंबर 23 रोजी शासन पातळीवर झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्या उपस्थितीत आणि उद्योगमंत्री यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश आणि १५ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते. मात्र तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही अशी बैठक अद्याप झाली नसल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना विदीत केले आहे. त्रिसदस्य समितीची अद्याप बैठक झालेली नाही हेही हनुमंत ताटे यांनी याबाबत निदर्शनास आणले आहे.