‘आता वेळ झाली’ला बॉलिवूडकरांकडून शुभेच्छा !

हेमामालिनी, नाना पाटेकर, अब्बास मुस्तान आदींनी दिल्या शुभेच्छा 

अनंत नारायण महादेवन दिग्दर्शि, लिखित ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते असून दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  इच्छामरण या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. म्हणूनच प्रेक्षकांसह या चित्रपटाबद्दल बॉलिवूडकरांनीही आपली मते व्यक्त केली आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ड्रिमगर्ल’ हेमामालिनी यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दलचे महत्व अधोरेखित करत अनंत महादेवन, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर नाना पाटेकर, सुचित्रा पिल्लई, दिग्दर्शक अब्बास मुस्तान, सुहासिनी मुळ्ये, आदिल हुसेन, तनिष्ठा चॅटर्जी यांनीही चित्रपटाला शुभेच्छा देत, चित्रपट पाहाण्याचे आवाहन केले आहे. तर इतरही अनेक कलाकारांनी या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.