उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शहापूर : शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी वरदान समजले जाते मात्र. या रुग्णालयात कार्यरत असणारे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक वर्ग 1 डॉ. प्रसाद भंडारी यांनी एका स्त्री रोग तज्ञ महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा गुन्हा शहापूर पोलीस स्थानकात दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला डॉक्टर ऑन कॉल बेसिसवर स्त्रीरोग म्हणून कार्यरत आहेत. 17 जानेवारी रोजी एक महत्त्वाची शस्त्रक्रिया करत असताना शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने त्यांनी आपल्या मदतीसाठी इतर आरोग्य सहका-यांना पाचारण केले. मात्र यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक प्रसाद भंडारी यांनी शस्त्रक्रियेदरम्यान पीडित महिला डॉक्टरच्या पाठीला वेगळ्या उद्देशाने स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. यावेळी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू असल्याने पीडितेने भंडारी यांचेकडे रागाने पाहून त्या बाजूला झाल्या. मात्र याच दिवशी सायंकाळी वासनांध अधिक्षक भंडारी यांनी सायंकाळी 4 वाजता पीडित महिला डॉक्टरला बोलावून माझ्याकडे दोन ऑन कॉल स्त्रीरोग तज्ञ असून उद्यापासून तुम्ही येण्याची गरज नाही असे बजावले.

याचा जाब विचारण्यासाठी पीडितेचे पती गेले असता तुमची पत्नी खोटे बोलत आहे. अशी बतावणी करून पोलिसांना पाचारण केले. मात्र घरी लहान बाळ असल्याने त्या दिवशी पीडित महिला डॉक्टरने फिर्याद नोंदवणे टाळले. मात्र आपलीच बदनामी होईल या कारणाने शांत बसलेल्या पीडित महिलेने आपल्या पतीच्या मदतीने शेवटी 30 जानेवारी रोजी या वासनांध अधिक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा शहापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.

कोरोना काळात 19 जुलै 2021 रोजी एका पीडित परिसेविकेने असभ्य वर्तन करणे व अश्लील वर्तन करणे अशा प्रकारची गंभीर तक्रार ऑर्थोपेडिक डॉ. प्रसाद भंडारी यांच्या विरोधात ठाणे येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमधील सिव्हिल सर्जन यांच्याकडे केली होती. या तक्रारीत साक्षीदार म्हणून चार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची साक्षीदार म्हणून नोंद केली होती. मात्र भंडारी यांनी असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले.