भारताचे लक्ष अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याकडे

अपेक्षेप्रमाणे, भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात १५९ धावांचा पाठलाग करताना भारताने अफगाणिस्तानला सहा विकेट्स राखून हरवले. आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी फक्त दोन आंतरराष्ट्रीय टी-२० सामने शिल्लक आहेत (आणि अर्थातच संपूर्ण आयपीएल सुद्धा) म्हणून एखादवेळी भारत इतर खेळाडूंना जे पहिल्या टी-२० मध्ये संघाचा भाग नव्हते त्यांना संधी देण्याचा विचार करू शकतो.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

 

टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि अफगाणिस्तान एकमेकांविरुद्ध सहा टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने पाच जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात त्यांनी फक्त एकच सामना खेळला आहे, जो या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना होता.

  भारत अफगाणिस्तान
आयसीसी टी-२० रँकिंग्स १०
टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने
भारतात

 

 

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान: इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, रशीद खान.

 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज

विराट कोहली: भारताचा हा माजी कर्णधार नोव्हेंबर २०२२ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळल्यानंतर १४ महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये परतणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिला टी-२० सामना खेळू शकला नाही. तथापि येत्या सामन्यात त्याचा चांगले प्रदर्शन करण्याचा निर्धार असेल. ११५ टी-२० सामन्यात, त्याने १३८ च्या स्ट्राईक रेटने आणि ५३ च्या सरासरीने ४००८ धावा केल्या आहेत. त्याने ३७ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

 

अर्शदीप सिंग: भारताचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये विकेट रहित असला तरी तो नवीन चेंडूने जबरदस्त प्रभावी होता. त्याने गोलंदाजीची सुरुवात केली आणि पहिलाच षटक मेडन टाकला. पॉवरप्लेमध्ये पहिल्या दोन षटकांत फक्त आठ धावा देत त्याने अचूक गोलंदाजी केली. अंतिम षटकांत त्याने गती परिवर्तन आणि यॉर्कर्सचा चांगला वापर केला.

 

मोहम्मद नबी: अफगाणिस्तानचा हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने दोन चौकार आणि तीन षटकारांसह २७ चेंडूत ४२ धावा केल्या. याशिवाय, त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी करत दोन षटके टाकली परंतु २४ धावा लुटल्याने तो महागडा ठरला.

 

मुजीब उर रहमान: अफगाणिस्तानचा हा ऑफस्पिनर भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याच्या संघासाठी सर्वात यशस्वी आणि किफायतशीर गोलंदाज होता. पॉवरप्लेमध्ये तो प्रभावी होता कारण त्याने त्याच्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात शुभमन गिलची विकेट घेतली. त्याने आपला चार षटकांचा स्पेल पूर्ण केला आणि २१ धावा देऊन दोन गडी बाद केले.

 

खेळपट्टी

या ठिकाणी आजपर्यंत पुरुषांचे तीन टी-२० सामने आयोजित केले गेले आहेत, ज्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी दोन जिंकले आहेत. येथे केलेली सर्वाधिक धावसंख्या २६० आहे आणि सर्वात कमी १४२ आहे. फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असेल ज्यामुळे उच्च धावसंख्येची स्पर्धा होऊ शकते. तथापि, फिरकीपटूंना काही मदत मिळेल. या ठिकाणी अव्वल दोन विकेट घेणारे खेळाडू फिरकी गोलंदाज आहेत.

 

हवामान

तापमान १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून हवामान थंड आणि धुके राहण्याची अपेक्षा आहे. २% ढगांचे आच्छादन असेल. पावसाची शक्यता नाही. पश्चिम-वायव्येकडून वारे वाहतील.

 

माइलस्टोन अलर्ट

  • रोहित शर्मा त्याचा १५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे
  • अक्षर पटेलला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे
  • मोहम्मद नबीला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ८१ धावांची गरज आहे

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १४ जानेवारी २०२४

वेळ: संध्याकाळी ७ वाजता

स्थळ: होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर

प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स १८