अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांवर किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता

ठाणे : अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि पावसानंतर झालेल्या वातावरणामध्ये होणारा बदल किडींच्या वाढीसाठी अनुकूल आहे. अशा वातावरणांमुळे आंबा आणि काजू पिकांवर किडींच्या प्रादुभार्वाची शक्यता आहे.

सद्यस्थितीमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे, शिवाय अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसानंतर वातावरणामध्ये होणारा बदल अनुकूल असल्याने अशा परिस्थितीत आंबा पिकावर तुडतुडे व फुलकिडी तसेच काजू पिकावर काजूवर ढेकण्या आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढवण्याची शक्यता आहे. तरी आंबा आणि काजू बागायतदारांनी आपल्या बागेची नियमित पाहणी करावी, असा मोलाचा सल्ला कृषी अधिका-यांनी शेतक-यांनी दिला.

तुडतुड्याची आर्थिक नुकसानीची पातळी (दहा तुडतुडे प्रतिपालवी मोहोर) ओलांडलेली असल्यास व ज्या ठिकाणी पीक पालवी अवस्थेत असेल अशा ठिकाणी डेल्टामेथ्रीन 2.8% प्रवाही नऊ मिल प्रति दहा लिटर पाणी, पीक बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास लांबडा सायहॅलोथ्रीन पाच टक्के प्रवाही सहा मिली प्रति दहा लिटर पाणी आणि पीक मोहोर अवस्थेत असल्यास ईमेडाक्लोप्रिड 17.8% प्रवाही तीन मिली किंवा न्यू प्रोफेझेन 25% प्रवाही 20 प्रति 10 लिटर पाणी तसेच जर फळे वाटाण्याच्या आकाराची अथवा त्याहून मोठी असल्यास थायोमेथॉग्जाम 25%, एक ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात वापरावे, असेही कृषी अधिकारी सांगतात.

फुलकीडीचा प्रादुर्भाव आढळल्यास संबंधित किडींच्या व्यवस्थापनासाठी स्पिनोसॅड 45% प्रवाही 2.5 मिली किंवा थायरो मेथॉग्जाम 25% दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत.

तसेच काजूमध्ये ढेकण्या आणि फुलकिडीचा प्रादुर्वभा वाढण्याची शक्यता असल्यामुळे पालवी, मोहर व फळधारणा झाली असल्यास त्याची पाहणी करावी. संबंधित किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास दोन्ही किडींच्या व्यवस्थापनासाठी लांबडा साय हॅलोथ्रीन पाच टक्के प्रवाही सहा मिली किंवा प्रोफेनोफॉस 50% प्रवाही दहा मिली, यापैकी एका कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावीत. संबंधित कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत,असा सल्ला ठाणे कृषी अधिकारी यांनी दिला.