ठाणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा उपेक्षित वर्गाला विम्याचे संरक्षण देण्याची व्यापक योजना रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमियमने भारतीय टपाल विभागाच्या मदतीने अलिकडेच सुरू केली.
ठाण्याच्या टपाल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी सुमारे ३०० नागरिकांनी लाभ घेतला, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष राम भटनागर यांनी दिली. रोटरीचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी, भारतीय टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी अदनान अहमद, श्रीमती सरण्या यु., समीर महाजन मोहम्मद शहीद, अभिषेक कडू आदी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.शेळके यांनी या उपक्रमात रिक्षा संघटनांशी समन्वय साधण्याचे काम केले.
या कार्यक्रमात पत्रकार दिनानिमित्त आनंद कांबळे, हेमलता वाडकर, अजित मांडके, एबीपी माझाचे अक्षय भाटकर, लोकमतचे अनिकेत घमंडी, छायाचित्रकार मनोज सिंग आणि अशोक घाग, गणेश कुरकुंडे, पुढारीच्या अनुपमा गुंडे, नम्रता सूर्यवंशी, चंदन पाटील, निशिकांत कार्लेकर आदींचा सत्कार करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी शिवाजी सानप आणि ठाणे महापालिका जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांचाही सत्कारमूर्तीत समावेश होता.
या विमा योजनेंतर्गत विम्याचा निम्मा हप्ता पहिल्या वर्षी रोटरी क्लबतर्फे भरण्यात येणार आहे. त्यामुळे विमा धारकास मोठी रक्कम वैद्यकीय उपचारासाठी मिळणार आहे. पोस्टाच्या सुकन्या समृद्धी, महिला सन्मान आदी योजना महिलांच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील, असे सांगण्यात आले. रिक्षाचालक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी रोटरीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
रोटेरियन कीर्ती वाडकर आणि बक्षी यांनी सूत्रसंचालन केले.