पुणे: सीरमने कोरोनानंतर डेंग्यू आणि मलेरिया या रोगांवर लस तयार करण्यात यश मिळवलं आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरम इस्टिट्युटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरिया रोगांचा लाखो लोकांना प्रादुर्भाव होतो, डेंग्यूमुळे काही लोक दगावलेही जातात. त्यामुळे अनेक वर्षापासून सीरम इस्टिट्युटचे शास्त्रज्ञ या रोगांवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते.
या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात आता यश आलंय.सीरमचे शास्त्रज्ञ डेंग्यू आणि मलेरिया बरोबरचं कर्करोगावरही संशोधन करत आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.