रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वे, मुंबई विभागात २३ एप्रिल २३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे.

माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर स. ११.०५ ते दु ३.५५ पर्यंत. छशिमट मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी. ३.१८ या वेळेत सुटणा-या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
छशिमट – चुनाट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छशिमट अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत.
छशिमट मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत. वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर सेवा आणि छशिमट मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणा-या डाउन हार्बर सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी. ३.२० पर्यंत छशिमट मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छशिमट मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर प्रवाशांना रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.