सेंचुरी रेयॉनची ठाणे ग्रामीण पोलीस संघावर मात
ठाणे: येथील सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या ४७व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या ‘क’ गटातील प्रथम फेरीत सेंचुरी रेयॉनने ठाणे ग्रामीण पोलीस संघावर ३४ धावांनी मात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
नाणेफेक जिंकून सेंचुरीने फलंदाजी स्वीकारली. ओम जाधव ३१ धावा (४१ चेंडू, ६ चौकार), प्रदीप पांडे २४ (३१ चेंडू, ३ चौकार) यांनी सेंच्युरीच्या डावास आकार दिला. तेजस मोरेने २९ धावांत ३ विकेट घेतल्या.
सेंच्युरीच्या १९४ धावसंख्येस उत्तर देताना ठाणे ग्रामीण पोलीस संघ ३३.१ षटकात १६० धावांपर्यंतच मजल मारू शकल्याने ही लढत सेंचुरीने ३४ धावांनी जिंकली. प्रदीप पांडेने २४ धावा आणि २३ धावत तीन विकेट घेऊन सेंचुरीच्या विजयात मोठा वाटा उचलला. प्रदीप पांडे सामनावीर ठरला.
संक्षिप्त धावफलक
सेंचुरी रेयॉन ३३.४ षटकात १९४८ ओम जाधव ३१, प्रदीप पांडे २४, तेजस मोरे ६-०-२९-३, महेश जाधव ७-०-२२-२, हितेश म्हात्रे २-०-३९-२) विजयी विरुद्ध ठाणे ग्रामीण पोलीस संघ ३३.१ षटकात १६० (युवराज डोंबे ४५, ८० चेंडू ३चौकार), महेश जाधव ३०, कुणाल तांडेल २२, प्रदीप पांडे ७-०-२३-३, दिनेश यादव ६-०-२६-२).