ठाणे महापालिकेच्या विजयात जयदीप परदेशी चमकला

ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट करंडक स्पर्धा

ठाणे : ठाणे महापालिकेने सिएट संघाचा १० विकेट्सनी दणदणीत पराभव करत ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ३५ षटकांच्या ४७ व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. जयदीप परदेशीचा अष्टपैलू खेळ, राकेश नाईकची अचूक गोलंदाजी आणि आकाश पाटीलची नाबाद फलंदाजी हे ठाणे महापालिकेच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात सिएट संघाच्या फलंदाजांना ठाणे महापालिकेच्या गोलंदाजांनी धावा करण्याच्या फारशा संधी मिळू दिल्या नाहीत. ठाणे महापालिकेच्या गोलंदाजांनी सिएट संघाला २५ व्या षटकात ८५ धावांत गुंडाळले. राकेश नाईकने एका निर्धाव षटकासह १५ धावांत तीन फलंदाज बाद केले. निखिल बहल आणि अतिष गावंडने प्रत्येकी दोन तर ओमकार रहाटे, शशिकांत कदम आणि जयदीप परदेशीने प्रत्येकी एक विकेट मिळवली. सिएट संघाकडून उत्कर्ष हजारेने २५, आकाश पाटीलने २३ आणि सुभाष चौरसियाने १७ धावांची खेळी केली.

कमी धावसंख्येचा पाठलाग करताना विकी पाटील आणि जयदीप परदेशी या सलामीच्या जोडीने ८.४ षटकात नाबाद ८७ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विकीने नाबाद ४५ आणि जयदीप परदेशीने नाबाद ४१ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक :
सिएट : २५ षटकात सर्वबाद ८५ ( उत्कर्ष हजारे २५, आकाश पाटील २३, सुभाष चौरासीया १७, राकेश नाईक ३-१-१५-३, निखील बहल ४-१७-२, अतिष गावंड ५-१६-२, ओमकार रहाटे ३-९-१, शशिकांत कदम ६-१-१३-१,जयदीप परदेशी ४-१-१५-१) पराभुत ठाणे महापालिका : ८.४ षटकात बिनबाद ८७ ( विकी पाटील नाबाद ४५, जयदीप परदेशी नाबाद ४१).