विद्युत वाहिनी स्थलांतरात बाधीत जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी

नवी मुंबई -: हायस्पीड रेल प्रकल्पाच्या मार्गात अति उच्च दाबाच्या तारांचा अडथळा येत आहे.आणि या तारा स्थलांतर कराव्या लागणार आहेत.आणि त्यासाठी ठाणे तालुक्यातील  शीळ,पडले, डावले व देसाई या गावातील जमीन बाधीत होत आहे.त्यामुळे या बाधीत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून येथील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
वरील  गावातील शेतजमीनीमधून नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) मुंबई यांचे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गासाठी एमएसईटीसीएलच्या व टाटा पॉवर कंपनी लिमिटेड यांच्या विविध ट्रांसमिशन लाईन्सचे स्थलांतर/उंची वाढवण्याच्या कामात बाधीत होत आहेत.सार्वजनिक प्रयोजनाच्या उद्देशाने होत असलेल्या या प्रकल्पाला  स्थानिकांचा विरोध नाही.परंतु बाधीत  होणाऱ्या भूखंडाचा योग्य व  समाधानकारक मोबदला मिळावा  अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.आणि.त्याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.