कसारा : ‘कल्याण-कसारा रेल्वे पॕसेंजर वेल्फेअर असोशिएशन कोअर कमिटी ‘ ची नवीन कार्यकारिणी निवड विशेष सभा, मावळते अध्यक्ष डाॕ.मनोहर सासे यांच्या अध्यक्षतेखाली ‘माध्यमिक विद्यालय’ संभाजीनगर आसनगांव येथे संपन्न झाली. रविवारी पार पडलेल्या या विशेष सभेत अध्यक्ष म्हणून सर्वानुमते कसारा येथील अभ्यासु व मेहनती व्यक्तिमत्व शैलेश मनोहर राऊत यांची निवड करण्यात येऊन इतरही पदाधिकारी निवडण्यात आले.या नूतन कार्यकारिणित सचिवपदी उमेश विशे,अजय गावकर प्रसिद्धीप्रमुख,गोपीनाथ जाधव कार्याध्यक्ष रमाकांत पालवे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चंदे,दिलीप पंडित कोषाध्यक्ष दिनेश घरत,सल्लागार सौ.अनिता झोपे,श्री.जगदिश धनगर,श्री.जितेंद्र विशेआणि महिलाप्रमुख मीना फर्डे,हिशोब तपासणीस श्री शिवाजी भोईर,कायदेशीर सल्लागार अॕड.जगदिश वारघडे ,सहप्रसिद्धीप्रमुख श्री.महेश तारमळे यांची निवड करण्यात आली.पुढीळ वाटचालीसाठी डाॕ.मनोहर सासे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.