नवी मुंबई : औद्योगिक उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि उत्पादित मालाच्या दळणवळण आणि साठवणूक याबाबतचे राष्ट्रीय धोरण नुकतेच जाहीर झाले. त्यासाठी महाराष्ट्र राज्यात नऊ ठिकाणी असे पार्क तयार होणार आहेत. त्यातील रायगड जिल्ह्यात उरण करांजा येथील खाडी किनारी आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक पार्क तयार होणार असून त्याची जबाबदारी एमआयडीसीवर दिली आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.
औद्योगिक उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि उत्पादित मालाच्या दळणवळण आणि साठवणूक याबाबतचे राष्ट्रीय धोरण नुकतेच जाहीर झाले. त्याच वेळी बंदरावरील सुविधा शुष्क प्रदेशात उपलब्ध करून देत राज्यात विविध नऊ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क सुरू केली जाणार आहेत. जालना, नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सांगली, भिवंडी, पुणे आदी जिल्ह्यांमध्येही मल्टी-लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार आहेत. त्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधीही नुकताच मंजूर करण्यात आला. त्यामुळे मालवाहतूक व साठवणुकीच्या क्षेत्रातील नवे बदल उपयुक्त ठरणार आहेत.रायगड जिल्ह्यात तयार होणाऱ्या लॉजिस्टिक. पार्कची जबाबदारी ही एम आय डी वर दिली आहे.आणि त्यासाठी उरण तालुक्यातील कारंजा येथील जागा निश्चित केली आहे.आणि या जागेचा विकास आराखडा व प्रकल्पाचा विकास अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.एम आय डी सी ने तशी निविदा काढली आहे.त्यामुळे आता लवकरच उरण मध्ये आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक पार्क आकार घेणार आहे.