ज्युपिटर हॉस्पिटलच्या ठाणे हार्ट प्रोजेक्ट मॅरेथॉनची घोषणा

ठाणे : ज्युपिटर हॉस्पिटलच्या वतीने जन्मजात हृदयविकाराच्या जनजागृतीसाठी ठाणे हार्ट प्रोजेक्ट मॅरेथॉन 5 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केली आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने शहरात मनोरंजक प्री-रेस सराव सत्रांसह भरपूर मजा आणि मनोरंजन पाहायला मिळेल.

रेमंड गेट, पोखरण नंबर २ येथून सकाळी ६ वाजता शर्यती सुरू होतील. यात पाच किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन अंतर श्रेणी असतील. १० किमी आणि २१ किमीच्या शर्यती वेळेनुसार केल्या जातील, जेथे आरएफआयडी-सक्षम बिब जारी केले जातील आणि ठाणे जिल्हा ऍथलेटिक असोसिएशनद्वारे शर्यती पात्र होतील.

डॉ. आशुतोष सिंग, ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडियाट्रिक कार्डियाक सर्जन आणि एक उत्साही मॅरेथॉन धावपटू म्हणाले, “ठाणे हार्ट प्रोजेक्ट मॅरेथॉन ही एक अर्थपूर्ण आणि परिणामकारक धाव असेल जी धावपटूंना मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्याची संधी देईल. सहभागीने धावलेले प्रत्येक किलोमीटरसाठी, ज्युपिटर फाउंडेशन मुलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी १०० रुपये देणगी देईल, ज्यामुळे त्यांना निरोगी आणि उज्ज्वल भविष्याची संधी देण्यात मदत होईल”.

या रनमध्ये ठाणे शहराच्या लाइफलाइन्सचाही सहभाग असेल. ठाणे पोलिस अधिकारी, ठाणे वाहतूक पोलिस, ठाण्यातील शाळांमधील शिक्षक आणि शाळेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे काही अधिकारी सहभागी होतील.