ठाणे: शहरातील नवीन कोरोना रूग्ण किंचित वाढले असून ११ रुग्णांची भर पडली आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ११जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९५०९१ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१६४जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३४८ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ११जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २५ लाख ४३,२९५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९७,३४७ जण बाधित मिळाले आहेत.