आज दिव्यातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीचे अस्तित्वातील जलवाहिनीस जोडणी करण्याचे काम अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे.

परिणामी, उद्या शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते शनिवार 12 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 या वेळेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेमार्फत निळजे येथून दिवा पूर्व, दिवा पश्चिम, साबे, दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन (प्रभाग क्र. 27 व 28) या भागाकरिता होणारा पाणीपुरवठा बंद राहील.

या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.