ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच असून आज २६७ नवीन रुग्णांची भर पडली तर २७५जण रोगमुक्त झाले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ११७ नवीन रुग्णांची भर पडली तर ५१जण वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. उथळसर येथे २५, लोकमान्य सावरकर नगरमध्ये २०, दिवा परिसरात १० रूग्ण वाढले आहेत. प्रत्येकी १५ रुग्णांची नोंद नौपाडा-कोपरी आणि वागळे प्रभाग समिती भागात नोंदवले आहेत. कळवा येथे नऊ आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात तीन रूग्ण मिळाले आहेत. दोन रुग्णांच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी २७५जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८४,०२९ जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २,१८३ जणांवर उपचार सुरू आहेत. एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१३१जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,२३४ नागरिकांची चाचणी घेतली असता २६७जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ५१,८७२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८८,३४३जण बाधित सापडले आहेत.