ठाण्याच्या सुयोग लोखंडेला अंबेजोगाईत कांस्यपदक

ठाणे : आंबेजोगाई येथे झालेल्या राज्यस्तरीय भव्य खुल्या पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमधल्या सुयोग लोखंडे याने कांस्यपदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.

या स्पर्धेचे हे ५ वे वर्ष असून संपूर्ण राज्यातून खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. पहिल्याच फेरीपासून चमकदार कामगिरी करत सुयोगने क्नॉक-आऊट फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या अतिशय अटीतटीच्या सामन्यात त्याला नागपूरच्या संकल्प गुराला याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु मुबंईच्या निहार केळकरसोबत झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीमध्ये तो वरचढ ठरला आणि त्याने कांस्यपदकाची सुनिश्चिती केली. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख श्रीकांत वाड आणि तसेच त्यांच्या सहकारी प्रशिक्षकांनी सुयोगच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.