जिल्ह्याचा ९५ टक्के तर ४५३ शाळांचा १०० टक्के निकाल

ठाणे : मार्च २०२४ या वर्षाचा दहावीचा ठाणे जिल्ह्यात ९५.५६ टक्के निकाल लागला. तर ४५३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे रात्रशाळांचा निकालदेखील ६७.२० टक्के आला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा वर्चस्व रखल्याचे दिसून आले आहे.

ठाणे जिल्ह्यात १,१३,७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७,८४१ मुलगे आणि ५५,५६२ मुली असे १,१३,४०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात ५४,५९८ मुलगे (९४,३९ टक्के) आणि ५३,७८० मुली (९६.७९ टक्के) असे १,०८,३७८ विद्यार्थी (९५.५६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कल्याण ग्रामीण भागात ३०९२ विद्यार्थ्यांपैकी २९७८ विद्यार्थी (९६.३१ टक्के) उत्तीर्ण झाले. अंबरनाथमध्ये ९१९७ विद्यार्थ्यांपैकी ८८३७ विद्यार्थी (९६.०८ टक्के) उत्तीर्ण झाले. भिवंडीमध्ये ५५१३ विद्यार्थ्यांपैकी ५२०८ विद्यार्थी(९४.४६ टक्के) उत्तीर्ण झाले. मुरबाडमध्ये २७१७ विद्यार्थ्यांपैकी २५६५ विद्यार्थी (९४.४०टक्के) उत्तीर्ण झाले. शहापूरमध्ये ५०१९ विद्यार्थ्यांपैकी ४८५१ विद्यार्थी (९६.६५ टक्के) उत्तीर्ण झाले. ठाणे महापालिका हद्दीतील २४०६६ विद्यार्थ्यांपैकी २२९१४ विद्यार्थी (९५.२१ टक्के) उत्तीर्ण झाले. नवी मुंबई महापालिका हद्दीत १५,६३६ विद्यार्थ्यांपैकी १५,२३८ विद्यार्थी (९७.४५ टक्के) उत्तीर्ण झाले. मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत १०,८२५ विद्यार्थ्यांपैकी १०,४९६ विद्यार्थी (९६.९६ टक्के) उत्तीर्ण झाले. कल्याण-डोंबिवलीमध्ये २१,२०६ विद्यार्थ्यांपैकी २०,३२९ विद्यार्थी (९५.८६ टक्के) उत्तीर्ण झाले. उल्हासनगर महापालिका हद्दीत ६०४५ विद्यार्थ्यांपैकी ५,६७३ विद्यार्थी (९३.८४ टक्के) उत्तीर्ण झाले तर भिवंडी-निजामपूर महापालिका हद्दीत १०,०८७ विद्यार्थ्यांपैकी ९३८९ विद्यार्थी (९२.०८ टक्के) उत्तीर्ण झाले.

ठमपा शाळांचा दहावीचा निकाल ८३.८४ टक्के

मार्च २०२४मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत ठाणे महापालिकेच्या २२ माध्यमिक शाळांचा निकाल ८३.८४ टक्के लागला आहे. गतवर्षी हे प्रमाण ७०.५७ टक्के एवढे होते. या वर्षी महापालिकेच्या तीन माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षी एका शाळेचा निकाल १०० टक्के लागला होता.

यंदा ठाणे महापालिकेच्या शाळांमधून १५२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळा क्रमांक १२, कौसा येथील मराठी माध्यमाची शाळा, शाळा क्रमाक १९, सावरकर नगर ही उर्दू माध्यमाची शाळा, तसेच, शाळा क्रमांक १६, सावरकरनगर ही इंग्रजी माध्यमाची शाळा यांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार यांनी दिली.

महापालिकेच्या आठ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तर, मराठी माध्यमाचा (१३ शाळा) एकूण निकाल ७३.४० टक्के लागला आहे. त्यातील मानपाडा आणि घोलाईनगर येथील रात्र शाळांचे एकूण १७ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू माध्यमाचा (०४ शाळा) निकाल ९१.४४ टक्के, इंग्रजी माध्यमाचा (०४ शाळा) निकाल ९६.९६ टक्के आणि हिंदी माध्यमाचा (०१ शाळा) निकाल ८७.५० टक्के लागला आहे.

कोकण विभाग अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे.

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. नागपूर विभाग 94.73 टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
पुणे : 96.44 टक्के
नागपूर : 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
मुंबई : 95.83 टक्के
कोल्हापूर : 97.45 टक्के
अमरावती : 95.58 टक्के
नाशिक : 95.28 टक्के
लातूर : 95.27 टक्के
कोकण : 99.01 टक्के