पनवेल-कर्जत लोकल मार्गातील बोगद्याचे ८० टक्के काम पूर्ण

ठाणे : मुंबई रेल्वे विकास महामंडळातील एमयूटीपी तीन प्रकल्पाच्या अंतर्गत नवीन पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा ‘वावरले’ हा बोगदा खोदण्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पात आरओबी आणि आरयूव्ही असणार असल्यामुळे पाच रोड ओव्हर ब्रिज 15 रोड व अंडर ब्रीज रूळ ओलांडण्यासाठीही एक पादचारी पूल असणार आहे. सर्वात बोगदा नढाळ. दुसरा बोगदा सर्वात लांब वावरले आणि किरावली तिसरा बोगदा आहे. नढाळ आणि किरवली बोगदा खाण्याचे काम सुरू असून सुमारे तब्बल 3144 मीटर लांबीच्या तीनही बोगद्यांचे 72 टक्क्यांहून अधिक पूर्णत्वास गेले आहे.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तीनही बोगद्यांमध्ये नियंत्रण प्रणाली देख•ााल करण्यासाठी परिभ्रमण क्षेत्र विद्युत दिवे आणि उत्कृष्ट वायूविजन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे ‘एमआरव्हीसी’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता यांनी सांगितले आहे.
पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग यासाठी 2782 कोटी खर्च होणार आहे आणि पनवेल, चिखली, मोहापे चौक, कर्जत ही स्थानके असून रेल्वे मार्गिकांची एकूण लांबी तीस किलोमीटर आहे शिवाय दोन उड्डाणपूल आणि तीन बोगदे असून 44 पूल आहे त्यापैकी आठ मोठे आणि 36 लहान आहेत. पहिला बोगदात नडाळ असून त्याची लांबी 20019 मीटर असून त्याचे काम 21 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू झाले होते.

दुस-या बोगद्यात दोन किलोमीटर अर्थात 2048 मीटरचे खोदकाम पूर्ण झाले असून आणि पूर्ण झालेल्या बोगद्यात काँक्रिटीकरण व अन्य खोदकाम सुरू आहेत दुस-या बोगद्याचे काम 29 सप्टेंबर 2023 रोजी झाले असून त्याची सद्यस्थिती 224 मीटर खोदकामाची झाली आहे.