ठाणे: जिल्ह्यात आज १०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून एक हजार रूग्ण सक्रिय झाले आहेत.
सर्वात जास्त ४३ नवीन रुग्णांची भर नवी मुंबई महापालिका हद्दीत पडली आहे.
ठाणे महापालिका परिसरात ४२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात प्रत्येकी चार रूग्ण नोंदवले गेले आहेत. उल्हासनगर आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी दोन तर मीरा-भाईंदर भागात तीन रूग्ण वाढले आहेत.
आत्तापर्यंत सात लाख ५०,३६६जण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी एक हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे शहरात ४६६ सक्रिय रूग्ण आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३८,१५४जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,९७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.