२०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेची एकदिवसीय कामगिरी
२०२३ मध्ये दोन्ही संघांची कामगिरी बऱ्यापैकी सारखीच होती. दक्षिण आफ्रिकेने १२ एकदिवसीय सामने खेळले आणि आठ जिंकले, तर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेपेक्षा जवळपास दुप्पट सामने खेळले आणि २२ पैकी १४ जिंकले. यावर्षी दोन्ही संघ समोरासमोर आले नाहीत परंतु एकदिवसीय सामन्यातील एकूण आकडे बघता, विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने आहे. कारण त्यांनी ८० पैकी ४५ सामने श्रीलंकेविरुद्ध जिंकले आहेत.
फलंदाजी विभागात, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (६३७ धावा) हा त्याच्या संघासाठी यावर्षी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ८० च्या सरासरीने आणि १०४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. दुस-या बाजूला श्रीलंकेच्या उजव्या हाताच्या टॉप ऑर्डरचा फलंदाज, पाथुम निसांका याने २० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६ च्या सरासरीने आणि ८७ च्या स्ट्राइक रेटने ८१९ धावा करण्याची विपुल कामगिरी केली आहे. हा २५ वर्षीय खेळाडू या कॅलेंडर वर्षात पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांमध्ये, दक्षिण आफ्रिकेचा उंच डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यानसनने आपल्या देशासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. या २३ वर्षीय खेळाडूने ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात एक फायफरचा समावेश आहे. श्रीलंकेचा ऑफस्पिनर महिष थीकशाना १५ सामन्यांमध्ये ३१ विकेटसह आपल्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. ज्यामध्ये तीन चार विकेट हॉलचा समावेश आहे. हा २३ वर्षीय खेळाडू पुरुष एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेणारा चौथा गोलंदाज आहे.
वर्ल्ड कपमध्ये कसे राहिले आहे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे प्रदर्शन?
दक्षिण आफ्रिका १९९२ पासून विश्वचषक खेळत आहे, तर श्रीलंका १९७५ च्या उद्घाटन आवृत्तीपासून. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या ६८ विश्वचषक सामन्यांपैकी ३८ सामने जिंकले आहेत (यशाचा दर ५९%). श्रीलंकेने पण ८० पैकी ३८ सामने जिंकले आहेत (यशाचा दर ४८%). हे दोन संघ सहा वेळा आमनेसामने आले आहेत आणि दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला चार वेळा पराभूत केले आहे.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका
अफगाणिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून (डीएलएस पद्धत) सात धावांनी पराभव झाला. दुसरीकडे श्रीलंकेने दोन सराव सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली. त्यांचा त्यांच्या आशियाई शेजारी बांगलादेशकडून सात गडी राखून आणि अफगाणिस्तानकडून सहा विकेट्सने (डीएलएस पद्धत) पराभव पत्करावा लागला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका: संघ, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसुन रजीथा, मथीशा पथीराना, दिलशान मधुशंका, दुषण हेमंता.
खेळण्याची परिस्थिती
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या पूर्वी दक्षिण आफ्रिकेने येथे दोन सामने खेळले. एक जिंकला आणि एक गमावला. तर श्रीलंकेने चार सामने खेळून एक जिंकला आणि तीन गमावले. १९८२ पासून या ठिकाणी २५ एकदिवसीय सामने आयोजित केले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणार्या संघांनी १२ सामने जिंकले आहेत आणि दुसर्या डावात फलंदाजी करणार्या संघांनी १३ सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या ३३० आणि सर्वात कमी ८३ आहे. या ठिकाणाने ऐतिहासिकदृष्ट्या फिरकीपटूंना मदत केली आहे, त्यामुळे या प्रकारचे गोलंदाज या सामन्यात प्रभाव पाडू शकतात.
हवामान
भरपूर सूर्यप्रकाशासह हवामान खूप उबदार राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन आणि पावसाची शक्यता नाही. पश्चिम-वायव्येकडून वारे वाहतील.
दक्षिण आफ्रिकेसाठी उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज एडन मार्करम महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याच्या शेवटच्या नऊ एकदिवसीय सामन्यांमध्ये, या अनुभवी खेळाडूने ७४ च्या सरासरीने आणि १२३ च्या स्ट्राइक रेटने ५१५ धावा केल्या आहेत. ज्यात नेदरलँड्सविरुद्ध खेळलेल्या १७५ धावांच्या डावाचा देखील समावेश आहे. गोलंदाजांमध्ये डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीवर लक्ष असेल. त्याच्या शेवटच्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १२ बळी घेतले आहेत. या ३३ वर्षीय खेळाडूने डावाच्या मधल्या टप्प्यात किफायतशीर गोलंदाजी करणे आणि भागीदारी तोडणे अपेक्षित आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ७ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)