ठाण्यात नवीन १९० रुग्ण

ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ किंचित कमी झाली आहे. आज १९० रूग्ण सापडले आहेत तर १७८जण रोगमुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत सर्वाधिक ८८ ररुग्णांची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात पडली आहे. ३२ रूग्ण वर्तकनगर,१८जण उथळसर, १७ रूग्ण लोकमान्य-सावरकर नगर, प्रभाग समिती परीसरात वाढले आहेत. नौपाडा-कोपरी आणि वागळे प्रभाग समिती येथे प्रत्येकी आठ रुग्णांची नोंद झाली आहे. प्रत्येकी पाच रूग्ण दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती भागात नोंदवले गेले आहेत. कळवा येथे सात रूग्ण मिळून आले आहेत तर दोन रुग्णांच्या घरचा पत्ता मिळाला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी १७८जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८३,७५४जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २,१९१जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ९६४ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये १९०जण बाधित सापडले होते. आत्तापर्यंत २४ लाख ५०,६३८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८८,०७६जण बाधित मिळाले आहेत.