जिल्ह्यात कोरोनाचे १६६ नवीन रूग्ण

ठाणे: जिल्ह्यात सलग दोन दिवस नवीन कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक सुरूच आहे. आज १६६ रुग्णांची भर पडली असून एक जण दगावला आहे.

सर्वात जास्त रूग्ण ठाणे महापालिका हद्दीत ७३ जण सापडले आहेत. नवी मुंबई येथे ५५ रुग्णांची भर पडली आहे. उल्हासनगरमध्ये १६ रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात सात, मीरा-भाईंदरमध्ये नऊ, बदलापूर भागात तीन, भिवंडीमध्ये दोन आणि ठाणे ग्रामीण भागात एका रुग्णाची वाढ झाली आहे.

आत्तापर्यंत सात लाख ५०,८२३जण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ९९८रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३८,६१२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर ११, ९८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.