ठाणे: शहरातील कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला असून आज अवघे सहा नवीन रूग्ण सापडले आहेत.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १९जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९५०६४रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १०४जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २१६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील २४६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये सहा जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २५ लाख ४२,६९२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९७,३३२ जण बाधित मिळाले आहेत.