नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आता एक मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रिकेटमध्ये रन आऊट आणि स्टम्पिंग या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. पण या दोन्ही बाद करण्याच्या पद्धतीमध्ये आता मोठा बदल करणार येणार आहे.
जर एखादा खेळाडू धाव घेत असताना धावत असेल आणि तो क्रीझमध्ये पोहोचू शकला नसेल तर त्याला बाद दिले जात होते. त्यावेळी बेल्स फक्त थोडीशी उडालेली असेल तरी चालत होते. पण आता बेल्स पूर्णपणे उखडल्या गेल्याशिवाय बाद दिले जाणार नाही.
जर खेळाडू फटका मारण्यासाठी पुढे सरसावला आणि यष्टीरक्षकाने बेल्स उडवली तेव्हा लगेच त्याला बाद दिले जाणार नाही. जेव्हा स्टम्पिंग करताना पूर्णपणे बेल्स उखडली गेली असेल त्यावेळी फलंदाजाला स्टमिंग बाद दिले जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा नियम आणला असला तरी तो या स्पर्धेसाठी नाही. हा नवीन नियम सुरुवातीला WPL 2025 मध्ये आता लागून करण्यात येणार आहे. त्यानंतर हा नियम बीसीसीआय अन्य स्पर्धांमध्ये लागू करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण सुरुवातीला तरी हा नियम फक्त महिलांच्या स्पर्धेत दिसणार आहे, नंतर आयपीएलमध्येही हा नवीन नियम पाहायला मिळू शकतो.
बीसीसीआयने प्रायोगिक तत्वावर आता हा नवीन नियम आणला आहे. त्यामुळे या नियमाचा कसा अवलंब केला जातो, हे बीसीसीआय पाहणार आहे. त्यानंतर हा नियम अन्य स्पर्धांमध्येही राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.