केसगळती : उपचार आणि काळजी

केसगळतीची समस्या लहान मुलांपासून ते महिला, पुरुषांमध्ये सगळ्या वयोगटात दिसते. अधिकतर महिलांमध्ये केसगळतीचा त्रास जास्त जाणवतो. केसगळतीची समस्या का होते? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि केसगळतीवर उपचार काय? या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या ‘डॉक्टर टिप्स’ या विशेष सदरातून जाणून घेऊया.

केस गळतीवर उपचार कोणते?
जर थायरॉईड, डायबिटीस, पीसीओडी, पीसीओएस किंवा न्यूट्रीशनच्या कमतरतेमुळे केसगळती होत असेल तर यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

केसगळती रोखण्यासाठीचे उपाय :
• निरोगी आणि दाट केसांसाठी हेल्दी डाएट घेणं फार गरजेचं आहे. तसेच आपल्या आहारात प्रोटीन (Protein) आणि व्हिटॅमिन (Vitamin) बरोबरच Biotin, Zinc, Selenium, Iron युक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर Omega-3 पॅटी अॅसिड पदार्थ म्हणजेच ड्रायफ्रूट्सचा समावेश करणे गरजेचे आहे.
• तसेच मांसाहारी डाएट करत असाल तर आहारात अंडी, मासे, मटण, चिकनचा समावेश करा.

• केसांवर जास्त प्रमाणात केमिकलचा वापर करणे टाळा.

मेथीच्या बिया
: 2-3 चमचे मेथीच्या बिया किंवा मेथीचे दाणे घेऊन ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी या बिया गाळून बाजूला ठेवाव्यात. नंतर या बिया (मिक्सरमधून) नीट वाटून घ्याव्यात व त्यांची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट केसांना लावावी व तासभर ठेवावी. त्यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत.

आवळा : आवळ्याचे वाळलेले तुकडे मिक्सरवर वाटून त्याची पावडर तयार करावी. अन्यथा बाजारातील रेडीमेड आवळा पावडर वापरावी. नंतर आवळा पावडरीमध्ये लिंबाचा थोडा रस आणि गरजेनुसार पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. हे मिश्रण केसांना लावून साधारण 45 मिनिटे केसांवर राहू द्यावे. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवावेत. नियमित वापराने अपेक्षित परिणाम दिसून येईल.

कोरफड :
कोरफडीच्या पानांमधून ताजा रस काढून एका बाऊलमध्ये ठेवावा. नंतर तो रस हातांवर घेऊन केसांना चोळून लावावा. केसांना नीट मसाज करून हा रस केसांवर 20-30 मिनिटे तसाच राहू द्यावा. नंतर केस सौम्य शॅम्पूने व पाण्याने स्वच्छ धुवावेत. नियमित वापराने अपेक्षित परिणाम दिसून येईल व केस गळती कमी होईल.

डॉ दीपाली अमीन,
बीएएमएस, पीजीडीपी,
प्रतिबंधात्मक कार्डिओलॉजी फेलोशिप

9766233414
माधवबाग