अंबरनाथमधून दोन अपक्षांची माघार

अंबरनाथ: अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून दोन अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतली आहे.

अंबरनाथ विधानसभेसाठी २४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी दोन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता अंबरनाथ विधानसभेत २२ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत.

अंबरनाथ विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांच्याकडे अपक्ष उमेदवार विश्वास सदाफुले आणि शैलेंद्र रुपेकर या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.