‘शहापूर तालुक्यातील विविध समस्या हिवाळी अधिवेशनात मांडणार’

अस्नोली,दि.२७(वार्ताहर)-शहापूर विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत मुंबई तसेच नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात तारांकित, लक्षवेधी, कपात सूचना, औचित्याचा मुद्दा यामार्ङ्गत नेहमी प्रशासनाला प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडणारे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ६० तारांकीत प्रश्न विचारले असून यापैकी काही प्रश्न सोडत पद्धतीने चर्चेला येतील तर काही प्रश्नांवर शासनामार्ङ्गत लेखी उत्तरे संबंधीत लोकप्रतिनिधीला देण्यात येतात. या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने तालुक्यातील पाणीटंचाई, मुंबई-नागपूर या समृद्धी एक्सप्रेसमध्ये जमिनी जाणार्‍या शेयकर्‍यांचे होणारे नुकसान, शहापूर येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातीळ रिक्त असलेल्या पदांबाबत, मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोल नाक्यावर वाहनधारकांची टोलमार्ङ्गत होणारी लूट, संपूर्ण शहापूर तालुक्यालाच पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत, क्रीडा संकुलनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत, चोंढें प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत, मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी व पडघा येथे सुरू असलेली टोलवसुली बंद करून एका ठिकाणी टोल वसुली करावी, भातसा धरणाच्या उजव्या कालव्याची देखभाल, दुरुस्तीअभावी झालेली प्रचंड दुरवस्था, तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांची झालेली दुरवस्था, डोळखांब, चोंढें ते नगर तालुक्यातील कळसुबाईदरम्यान घाट रस्ता तयार करणे, शहापूर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय भवनाच्या इमारतीबाबत, नामपाडा धरणाच्या रखडलेल्या कामाबाबत, बिरवाडी उपसा जलसिंचन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत, वासिंद येथील एस्सेल पोपॅक कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी शेतात सोडल्याने शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीबाबत, गारगाव आश्रमशाळेला जमीन दिलेल्या शेतकर्‍याला मोबदला न मिळाल्याबाबत अशा प्रकारचे ६० तारांकित प्रश्न या येणार्‍या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार बरोरा मांडणार असून यामुळे तालुक्यातील विकासाला नक्की चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

अस्नोली