स्वामी समर्थ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, वसारचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

वासिंद,दि.१५(वार्ताहर)-स्वामी समर्थ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यास्नेहसंमेलनात कवायत आंतरराष्ट्रीय विभागीय वार्षिक सहल, स्वच्छ भारत मेळावा, खाद्य मेळावा, शालेय क्रीडास्पर्धा व सहभागी झालेले विद्यार्थी व प्रसर्धन भेट, लांब उडी, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, कला-क्रीडा यामध्ये सहभाग झालेल्या तीन विजेत्या विद्यार्थ्यांना पहिला गट इ. १ ली ते ४ थी व दुसरा गट ५ वी ते १२ वी यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी व पालकवर्ग, शिक्षकवृंद, शिक्षक-कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामी समर्थ हायस्कूल वसार संचालक विठ्ठल काळू वायले, संचालक दिलीप बी. पाटील, रमेश कोळेकर, मराठे, सुरज पांडुरंग मडवी, मुख्याध्यापक गणेश कृष्णा कोळेकर, प्रमुख पाहुणे वैभवशेठ गायकवाड, शाम पाटील, राजाराम पाटील, विलासभाई पाटील, अनिल वायले, बाळाराम वायले व बालविकास विद्यामंदीर मुख्याध्यापिका, भारती कोळेकर, पाटील, आसोले, मेहर, भाग्यश्री, वारे, ठाकरे, महाजन, जाधव, राणे, देशमुख, शेख, इतर मान्यवर शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

वाशिंद