सरळगाव व्यापारी संकुलाविरोधात ठाणे येथे लक्षवेधी उपोषण

सरळगांव,दि.६(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे ग्रामपंचायतच्या जागेवर मुदतबाह्य बिनशेती परवानगीने शासकीय मंजुरीपूर्वीच बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे गैरव्येवहारातील माजी सरपंच मधुकर घुडे, माजी उपसरपंच दीपक घुडे यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम ३९(१)व ग्रामसेविका अिेशनी यशवंतराव यांच्यावर जिल्हा परिषद सेवाशर्थी नियमान्वये निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश काढला आहे. सरळगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नं. ३४ च्या ३३८८ चौ. वार क्षेत्रात प्रशासकीय मंजुरीआधीच लोकवर्गणी घेऊन बांधलेल्या अर्धवट व्यापारी संकुलाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी व पावसाळी अधिवेशनात सहा आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये सरळगाव व्यापारी संकुल हे बेकायदेशीर व अनधिकृत असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना पत्राने कळविले आहे. त्यासंदर्भात सुनावणी होऊन बेकायदेशीर काम करणार्‍या सरपंच मधुकर घुडे, उपसरपंच दीपक घुडे यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम अन्वये ३९(१) ने निलंबनाची व जिल्हा परिषद सेवाशर्थी नियमांन्वये ग्रामसेविका अिेशनी यशवंतराव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, परंतु निलंबनाची कारवाई व गाळ्यांच्या लिलावास मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ठाणे यांचा स्थगिती आदेश असतानाही माजी सरपंच मधुकर घुडे, उपसरपंच दीपक घुडे यांनी मनमानी कारभार ग्रामविकास अधिकारी यांच्या अनुपस्थितीत करून लिलाव ताबा पावत्या दिल्या आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक चालू असतानाही आचार संहिता कालावधीत ग्रामविकास अधिकारी यशवंत महाडसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश धुडकावून २३ लाख ५ हजार रुपयांची अनामत रक्कम घेतल्या आहेत, त्यामुळे व्यापारी संकुलाच्या लिलावास व बांधकामास स्थगिती असल्याचे नागरिकांना सांगणार्‍या ग्रामविकास अधिकारी यशवंत महाडसे यांनी आचारसंहिता चालू असताना तसेच सरपंच निवडीच्या दिवशी अनामत रक्कम का जमा केल्या आहेत, असा जाब नागरिक विचारीत आहेत. संबधित ग्रामविकास अधिकारी नागरिकांची, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे व लक्षवेधी करणार्‍या आमदारांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानेच व्यापारी संकुल बांधकाम व लिलाव करण्याची नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून उपोषण करण्यात आले. या उपोषणास नवनिर्वाचीत सरपंच नेताजी घुडे, दिलीप घुडे, चेतन घुडे, सोमनाथ घुडे, राजेंद्र घुडे, रमेश गायकवाड, एकनाथ घुडे, महेश घुडे, अनिल घुडे तसेच या उपोषणास किरण निचिते, प्रकाश जाधव, अविनाश उबाळे या पत्रकरांनी पाठिंबा दिला आहे.

सरलगाव