संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने आरोग्यतपासणी शिबीर उत्साहात

खर्डी,दि.२३(वार्ताहर)-येथील संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने शिरोळ येथील अतिदुर्गंम भागातील गायधरा या आदिवासी पाड्यावर संस्थापक अध्यक्ष साहित्यिक डॉ. कृष्णा सपाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक तीन वर्षापासून सपाटे दांपत्य खर्डी-कसारा परिसरातील आदिवासी वाड्यावस्तींवर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्यबाबत जनजागृती करीत असतात. यावेळी आदिवासी पाड्यांवर आरोग्याबाबात असलेल्या गैरसमजामुळे येथील रहिवाशी आजारी पडलेल्या रुग्णाला दवाखान्यात न नेता भगत-भौंदू बाबा यांच्याकडे नेऊन आजही गंडा बांधणे, भस्म लावणे अशा अंधश्रद्धा पाळत असतात, त्यामुळे रुग्णावर योग्य उपचार होत नसल्याने अनेकांचे जीव आजही जात आहेत. यासाठी येथील पाड्यावर जमलेला लोकांना या शिबिरात आरोग्याबाबात व व्यसनाबाबत डॉ.सत्यवती सपाटे, डॉ.कृष्णा सपाटे, जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य के.आर.कळकटे व पत्रकार नरेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कुपोषणाचे प्रकार वाढत असल्याने येथील राहिवाशांना पौष्टिक आहारच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले. यावेळी ४५६ रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे वाटप करण्यात आली. यावेळी बुधा शिंगवा, गांजवे, नवलेसर, नयन साताळकर, बाळू सपाटे यांच्यासहीत अनेक मान्यवर उपस्थित होते.

खर्डी