श्री ट्युटोरिअल्सचा गुणगौरव आणि सांस्कृतिक सोहळा उत्साहात

सरळगांव,दि.१८(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना माङ्गक दरात शैक्षणिक मार्गर्शन करणारी श्री ट्युरोरिअल गेली आठ वर्षे काम करते. दरवर्षी अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्त्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. श्री ट्युटोरिअल्सच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच संतकृपा बिल्डिंगच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्च २०१५ या वर्षात इ. १० वीमध्ये ९५.६० टक्के गुण मिळवून मुरबाड तालुक्यात प्रथम आलेली कु. नेहा प्रविण चव्हाण व इ. १२ वीमध्ये विज्ञान शाखेत ७९ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आलेली कु. आरती बाळकृष्ण कापडी तसेच १० मध्ये मराठी विभागात ९१ टक्के गुण मिळवणारा विशाल राजेंद्र खाटेघरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सोशल मीडियाचे हायटेक डिजिटल स्कूलचे प्रवर्तक म्हणून प्रसिद्ध असलेले शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा या शाळेचे शिक्षक संदीप गुंड, मराठी मालिकेत काम करणारे पांडुरंग भारती, महाराष्ट्र अभ्यासक्रम महामंडळाचे सदस्य बाळकृष्ण शिंदे, टी.डी.सी बँकेचे संचालक, सुभाष पवार, मुरबाड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष रामभाऊ दळवी, जनसेवेचे चिटणीस भास्कर हरड आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांना प्रत्येकी आंबा, चिकू अशी झाडे देऊन स्वागत केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी लक्ष्मण भांडे यांनी पाहुण्यांना दिलेली झाडे लावा झाडे जगवा अशी विनंती केली. या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मण भांडे व राजेश पाटील यांनी केले होते. तर यावेळी सूत्रसंचालन जयश्री इसामे यांनी केले.

सरलगाव