शेणवे शाखा सहाय्यक अभियंता आहे की ठेकेेदार?

आसनगाव,दि.२७(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा भोंगळ व अनागोंदी कारभार चर्चेत असतानाच शेणवा या ठिकाणी शाखा सहाय्यक अंभियंता या पदावर असलेले श्रीनिवासन महामंडळाचे काम करण्यापेक्षा ठेकेदारी करताना दिसून येत आहेत. सामान्य नागरिकांना एका विद्युत कनेक्शनसाठी दररोज हेलपाटे मारून दोन-तीन महिने वाट पाहावी लागते तर श्रीमंतांच्या ङ्गार्म हाऊसवर लगेचेच त्यांना ट्रान्सङ्गॉर्मर बसविले जात आहेत, अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत व कार्यालयात कधीतरीच दिसणारे हे अधिकारी अंभियता आहेत का ठेकेदार, असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूवीँ आदिवली येथील कान्हे या ङ्गार्महाऊसवर ३१५ के.व्ही.चा ट्रासंङ्गार्मर बसवून एच.टी. व एल.टी लाईनचे काम श्रीनिवासन यांनी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन केले आहे. तसेच त्यांनी मंजूर नसलेल्या प्लॉंटमधील पोल शिप्टीगचे काम चालू असून निमानपाडा येथे लाईन मंजूर नसतानादेखील ङ्गार्महाऊससाठी कनव्हर्जन करून नवीन लाईन व पोल टाकण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी विद्युत कंपनीचे साहित्य वापरून कामे करून घेतली आहेत. अजूनही बरेच ठिकाणी या सहाय्यक अंभियत्याची कामे चालू असून वायरमन जगताप व गंवादे नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असून वरिष्ठ अधिकारी त्यांना अभय देत असल्याचे कर्मचार्‍यांच्या बोलण्यावरून येत आहे. एखाद्या शेतकर्‍याने मीटरसाठी अर्ज केला तर त्याच्याकडे जास्त पैशांची मागणी केली जाते व मीटर बसवायला कमीत कमी तीन-चार महिने उलटून जातात व त्यातही अंतर जर १२० ते १५० ङ्गूट असेल तर मीटर दिला जात नाही. उलट एखाद्या ङ्गार्महाऊसवाल्याचे पैसे घेऊन कितीही अंतर असले तरी काम केले जात आहे. आउट सोर्रसिंगचे कर्मचारी, वायरमँन अनधिकृतपणे काम करतात. अशा कामचोर व मुजोर अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत पानसरे यांनी मुख्य अभियंता जलतरे यांच्याकडे केली आहे. सदर शेणवे विभाग म.रा.वि.मं चे सहाय्यक अभियंता श्रीनिवासन यांची लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती करवाई करण्यात येईल, असे जलतरे, मुख्य अभियंता, कल्याण यांनी ठाणेवैभवशी बोलताना सांगितले.

आसनगाव