शहापूरात विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

किन्हवली,दि.२१(वार्ताहर)-कुणबी महोत्सव प्रतिष्ठाणतर्फे शहापूर तालुक्यातील इ.१० वी आणि इ.१२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयुष्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शकांकडून करियर गाईडन्स शिबिराचं आयोजनही २५ जून रोजी शहापुर मधील वैश्य वाणी हॉल येथे दुपारी २ वाजता करण्यात आले असून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास आणि मार्गदर्शन शिबिरास आमदार किसन कथोरे ,विेशनाथ पाटील, दशरथ तिवरे कुणबी सेना प्रमुख, किशोर कुडव अध्यक्ष समाज नेते, कुणबी समाज उन्नति संघ अनेक विविध संघटनांचे सन्माननीय पाहुणे उपस्थित राहणार असून सत्कारमूर्तीं किशोर ठाकरे, ठाणे जिल्हा मुख्य वनसंरक्षक. मधूकर फर्डे आयुक्त, ठाणे श्रममंत्रालय भारत सरकार, राजेश विशे सहाय्यक आयुक्त, सेल्स टॅक्स विभाग, नरेंद्र पाटील, सर्वपक्षीय जेष्ठ नेते व पदाधिकारी, समाजसेवक आणि सर्व समाज बांधवासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी. कुणबी महोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र चंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ ऐवजी शालोपयोगी वस्तू आणि त्या वस्तूंचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करणार असल्याने जाहिर केले.

किन्हवली