वासिंद बाजारपेठेत वाहतूक कोंडी; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

वासिंद,दि.२६(वार्ताहर)-वासिंद बाजारपेठेत व स्टेशन रोड परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून काही वाहन चालकांच्या अरेरावी भाषेमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वासिंद रेल्वे स्थानक असल्यामुळे आजूबाजूच्या गावांतील हजारोंच्या संख्येने नोकरी व्यवसाय व कामानिमित्त प्रवाशांची तसेच विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेजसाठी सतत रहदारी सुरू असते. त्यामुळे वासिंद नाका ते स्टेशन हा परिसरसकाळी व विशेषता सध्यांकाळी वाहतुकीने गजबजलेला असतो आणि अशाचवेळेस काही वाहनचालक हे आपल्या गाड्या कशाही प्रकारे रस्त्यावर लावून निघून जातात. त्यामुळे दुसर्‍या वाहनांना पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आणि अशा अनेक कारणांमुळे नागरिकांमध्ये भांडणेही होतात. तसेच वासिंद नाका ते रल्वे स्टेशन यादरम्यान वासिंद बाजारपेठेमध्ये दुतर्ङ्गा मोठ्या प्रमाणात भाजीविक्रेते, ङ्गळविक्रेते, अनेक छोटेमोठे धंद्यांवाले ठाण मांडून बसतात, त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तरीही वासिंद ग्रामपंचायतीकडून अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकाराला वासिंद ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन जबाबदार असून यासंदर्भात अनेक राजकीय पक्षांनी निवेदन देऊनसुध्दा कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व समस्यांचे गांभीर्य ओळखून मुख्यता वासिंद नाका ते रेल्वे स्टेशन या विभागातील वाहतूक सुरळीत व्हावी, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे.

वाशिंद