वाढदिवसादिनी कल्पेश अग्रवाल यांचा अनोखा उपक्रम

शेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-नामवंत उद्योजक, साई कला ऍकॅडमीचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस कल्पेश अग्रवाल यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसादिनी अग्रवाल यांनी टिटवाला गणेश मंदिर येथे मोदक वाटप, मातोश्री वृद्धाश्रम येथे ङ्गराळ वाटप, रक्तदान शिबीर, प्राथमिक शाळा गोठेघर, लक्ष्मणनगर, प्रेम सावली इंग्लिश मीडियम स्कूल डिजिटल करणे, अर्जुनली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना १० टॅब वाटप, प्राथमिक शाळा टेंभरे व अनुदानित आश्रमशाळा गोठेघर येथील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी साई कला अकॅडमीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांनी कल्पेश अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एक विस्मयकारक समाजसेवक, एक चांगला मित्र, उदार अंतरकरणांची व्यक्ती असे व्यक्तीमत्व खरोखर प्रेरणा ठरलेले आहे. कल्पेश अग्रवाल यांना दीर्घायुष्य मिळो ही सदिच्छा शाळकरी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शेंद्रुण