वनदीप महाविद्यालयाच्या तेराव्या वर्धापन दिनी विद्यार्थी आणि मान्यवरांचा गौरव

टिटवाळा,दि.२६(वार्ताहर)-कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा तेरावा वर्धापनदिना निमित्त कल्याण, मुरबाड तालुक्यातील १० व १२ वीमधील यशवंत विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांना जीवनदीप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, या सोहळयास कल्याणचे प्रांत अधिकारी प्रसाद उकिर्ड व मुंबई विद्यापीठ उपकुलसचिव कृष्णा पराड, राजाभाऊ पातकर, चंदू बोष्टे, जयराम भोईर संस्थेचे आध्यक्ष रविंद घोडविंदे, समाज कल्याण न्यासचे आध्यक्ष सोन्या पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या बाराव्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालय आणि सहभोवतालच्या परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. महाविद्यालय क्रिडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला असून विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय सेवा विभागात मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम स्वयंसेवक ठरलेल्या ओमकार पाटील याचा देखील सत्कार करण्यात आला. यावर्षी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी नूतन वेबसाइट, ऍप, डिजिटल ग्रंथालय व अद्यावत जिमखाना अशा सुविधा सुरू करून वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादन करणार्‍या नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रांत अधिकारी प्रसाद उकिरडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर मुंबई उपकुलगुरु कृष्णा पराड यांनी मुंबई विद्यापीठ जीवनदीप महाविद्यालयास सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत विद्यापीठातील उपक्रची माहिती दिली या मान्यवरांच्या हस्ते जैवनती लोणे, सरपंच पूनम शेळके, संदीप येगडे, पारधी सुमन, सुरेश चेडे, कीर्तनकार कुमारी खाटेगरे,यांचा गौरव करण्यात आला. गोवेली गावात दिडशे विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या जीवनदीप महाविद्यालयात यावर्षी चार हजारहुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून केजी ते पीजी पर्यंतच्या शिक्षणाच्या सुविधा आहेत.विद्यापीठात क्रिडा क्षेत्रात महाविद्यालय बाराव्या क्रमांकावर असून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभाग यावर्षीचा कल्याण विभागातील सवोत्तम विभाग म्हणून निवडण्यात आला आहे.महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशासकिय,सामाजिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.प्रारंभी प्राचार्य डॉ.के.बी.कोरे यांनी प्रास्ताविक केले, यावेळी महाविद्यालयास रुग्णवाहिका समाज कल्याण न्यास तर्फे देण्यात आली, यावेळी नाना पिसाट, चंद्रकांत गायकर, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

टिटवाळा