लोकसहभागाशिवाय दारूबंदी करणे अशक्य -प्रशांत बुरडे

अनगांव,दि.२२(रोहिदास पाटील)-भिवंडी तालुका पोलिसांच्या वतीने कवाड येथे गावठी दारूबंदी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी गाव-पाड्यातील दारूबंदी करण्याच्या प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यास कमी-अधिक प्रमाणात यश येत आहे, मात्र ते शक्य करायचे असल्यास लोकसहभागाशिवाय शक्य नाही. दारूबंदीला महिलांनी सहकार्य केल्यास भिवंडी तालुक्यासह जिल्हा दारूबंदी करणे सोपे जाईल, असे मत कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुरडे यांनी व्यक्त केले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील दारू सेवनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, त्यामुळे दारूबंदीचा हा शिवधनुष्य पेलवणार आहेत काय, असा प्रश्न होता. मात्र ते पोलिसांच्या कामगिरीमुळे व दारूनिर्मिती व वाहतूक करणार्‍यावर केलेली कारवाई मोक्काखाली गुंडांवर केलेले गुन्हे दाखल व शिबिरे घेऊन लोकांच्या प्रबोधनामुळे ते साध्य होत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेश पाटील यांनी केले. टेभिवली गाव दारूबंदी करणारे पोलीस पाटील अच्युत नांदूरकर यांनी वेसन सोडणार्‍यांना सन्मानित केले. पोलीस उपआधिक्षक भास्कर पिंगट, वपोनि धनाजी श्रीरसागर, सहापोनि जाधव, बाळाराम भोईर, किरण चन्ने, मलंग शेख, संगीता भोमटे, कवाड पंचायतीचे सरपंच कविता भांगरे, नितीन जोशी, जयमाला पाटील उपस्थित होते.

अनगाव