राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अजित पवार शहापुरात येणार

अस्नोली,दि.१९(वार्ताहर)-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शहापुर तालुक्यात भव्य कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोहळा ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, वसंत डावखरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. बरोरा यांनी दिली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पोर्शभूमीवर हा मेळावा लावल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मुख्य म्हणजे आ. बरोरा यांच्या विधानसभा सदस्याचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

अस्नोली