राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुरबाडचा विराज मार्के प्रथम

सरळगाव,दि.२२(वार्ताहर)-शरद पवार यांच्या संसदीय कार्यकाळास पंन्नास वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. यात वक्तृत्व स्पर्धेत मुरबाड तालुक्यातील जांबुर्ढे या गावातील विराज मार्के याचा प्रथम क्रमांक आला असून तालुक्यातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लहानपणापासूनच घरातील सुशिक्षित वातावरणात वावरत असताना विराजला वक्तृत्वाची आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी विराजने मुरबाडमध्ये तालुकास्तरीय ठेवण्यात आलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर शाळास्तरीय अनेक ठिकाणी प्रथम क्रमांक घेत प्रमाणपत्रे मिळवली. अनेक ठिकाणी शिव व्याख्यानेदेखील केली. मार्के हे जेव्हा शिवव्याख्यान सांगत असतात तेव्हा ते ऐकण्या श्रोते लिन होतात. १४ जानेवारी रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत ११५ स्पर्धक राज्यातून आले होते. त्या ११५ स्पर्धकांतून विराज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते विराजला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व पंचवीस हजारांचा धनादेश देवून सन्मानित करण्यात आले.

सरलगाव