मुरबाड शहरातील टपरीधारकांना पोरके होऊ देणार नाही -आमदार कथोरे

सरळगाव,दि.२५(वार्ताहर)-मुरबाड शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला आसणारी छोटी-मोठी दुकाने, टपर्‍या रस्तारुंदीकरणात निम्यापेक्षा जास्त तूटणार आहेत, असे दुकानदारांना समजताता त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे धाव घेतली. बाजारातील रस्त्याची रुंदी नियमाप्रमाणे ४६ ङ्गूट असल्याने बाजारातील बरेचसे दुकानदार निराधार झाले असते. रस्त्याची रुंदी ४६ ङ्गुटावरून ४२ ङ्गूट करून आमदार किसनजी कथोरे यांनी स्वतः टपरीधारकांची भेट घेऊन दिलासा दिला आहे. याबाबतच सविस्तर वृत असे की. मुरबाड शहरातील मुख्य रस्तारुंदीकरणाच काम मरबाड नगरपंचायतीने हाती घेतले असून ४६ ङ्गूट रुंदीप्रमाणे होणार होता याबाबत मुरबाड शहरातील टपरीधारकांनी आमदार किसनजी कथोरे यांची भेट घेऊन आमचा रोजगार वाचवा, अशी वारंवार विनंती केल्याने आमदार कथोरे यांनी रोजगारापासून वंचित राहाणार्‍या टपरीधारकांना न्याय देवून त्यांचा रोजगार वाचवला आहे. ४६ ङ्गूट रस्ता रुंद होणार असा प्लॅन तयार होऊन त्यास मान्यता मिळाली होती. त्यामुळे बाजारपेठेतील अनेक टपर्‍या तुटणार होत्या व अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार होती, पण ती वेळ आता आमदार कथोरे यांच्यामुळे टळली आहे, त्या मुरबाड शहरातील टपरीधारकांनी आमदार कथोरे यांचे आभार मानले आहेत.

सरलगाव