मुरबाड उपजिल्हा रुग्णालय डायलिसिसवर

सरळगांव,दि.१४(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील ग्रामिण भागातील दोन ते अडीच लाख जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला, परंतु डॉक्टर, कर्मचार्‍यांअभावी या रुग्णालयाची सेवा डायलिसिसवर आहे काय, असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे. मुरबाड हे तालुक्याचे ठिकाण असून नगर-कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असले तरी बहुतांश भाग मागासलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील गरिबातील गरिबाला आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून या ठिकाणी असलेल्या ग्रामिण रुग्णालयाला उपरुग्णालयाचा दर्जां शासनाने दिला, परंतु दोन-चार कर्मचारी, दोन वैद्यकिय अधिकारी सोडले तर सर्वच कर्मचारी रोजदांरीवर काम करीत असून अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे उघड झाले असल्याने रूग्णांचे मात्र हाल होत आहेत. हे रुग्णालय महत्त्वाच असतानादेखील शासन अथवा लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षित होत असून अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामध्ये ङ्गार्मासिस्ट, मेडिकल सुप्रिटेंड, सूक्ष्म सेवक, वैद्यकिय अधिकारी, सङ्गाईगार, औषध निर्माता, भुलतज्ज्ञ अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने, रुग्णसेवेवर ताण पडत असून असलेले डॉक्टर व रुग्ण यांच्यात खटके उडत आहेत. आज या रुग्णालयात ४०० बाह्यरुग्ण दररोज उपचार घेत असून सर्पदंश, डिलेवरीसाठी आलेल्या महिलाांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच या रुग्णालयाकडे लक्ष द्यावे अन्यथा याचा ङ्गटका सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांना नाहक भोगावा लागेल. मुरबाड रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला, परंतु डॉक्टर व कर्मचार्‍यांची उपलब्धता करून न दिल्याने रात्रंदिवस आम्हाला काम करावे लागत आहे. आम्हीसुद्धा माणूस आहोत आणि मग रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आम्हाला समजून न घेता आमच्याशी भांडण करतात, असे डॉ. आशिलाख शिंदे ग्रामिण रुग्णालय, मुरबाड यांनी सांगितले.

सरलगाव